आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात डंपरच्या धडकेत सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्याचा जागेवरच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ आज (गुरुवार) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृत तरुण हा सिम्बायोसिस महाविद्यालयातील विद्यार्थी होता.

आशिष दीपक पाऊसकर (वय- 20, 22 शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो सिम्बायोसिस महाविद्यालयात इंजिनिअरिंगला शिकत होता. तर त्याचे वडील मुंबईला राहतात. आई शिक्षिका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष त्याच्या मित्रासोबत (एमएच-14 एआय 8748) या अॅक्टिव्हा गाडीवरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात होता. त्याला डंपरने धडक दिली यात आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याबरोबर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. जखमीला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. डंपर चालकाला निगडी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...