आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंग मोबाईल घेताय, सावधान!!! पुण्यात होतोय बनावट मोबाईल विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोनची तपासणी करताना सॅमसंगचे अधिकारी. - Divya Marathi
फोनची तपासणी करताना सॅमसंगचे अधिकारी.
पुणे- पुणे तसेच पिंपरी कॅम्प परिसरातील मोबाईल दुकानदार सॅमसंग कंपनीचा बनावट लोगो वापरून बनावट मोबाईल व त्याच्या सुट्ट्या भागांची विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. सॅमसंग कंपनीचे बनावट मोबाईल व सुटे भाग विक्री होत असल्याबाबत कंपनीने दिल्लीतील हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने कारवाईचे आदेश देताच अशा दुकानादारांवर छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे.
सॅमसंग कंपनी अधिका-यांनी पिंपरी कॅम्प, तसेच पुण्यातील बुधवार पेठेमधील मोबाईल विक्री करणार्‍या दुकानांवर बुधवारी दुपारी छापे घातले. मोबाईल दुकानांची तपासणी करून या दुकानांमधून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरीतील मोबाईल मार्केटमध्ये खळबळ उडाली. काही दुकानदारांनी दुकाने बंद करून पळ काढला. या छाप्यात एक लाख मोबाईल ऍक्सेसरीज सील करण्यात आल्या; तर काही मोबाईल सेट जप्त करण्यात आले.
पिंपरीतील साई चौकात आणि पुण्यात बुधवार पेठेतील तपकीर गल्लीत विविध कंपन्यांच्या मोबाईल विक्रीची मोठमोठी दुकाने आहेत. काही दुकानांमध्ये कंपनीच्या ब्रॅण्डचे हुबेहूब उत्पादन असणारे बनावट मोबाईल व सुटे भाग सर्रासपणे विक्री केले जातात. कंपनीच्या मोबाईलच्या किमतीपेक्षा हे मोबाईल कमी किमतीत विकले जातात. या व्यवहाराच्या बनावट पावत्या केल्या जातात. सॅमसंग कंपनीचे बनावट मोबाईल व सुटे भाग सर्रासपणे विक्री होत असल्याची बाब सॅमसंग कंपनीच्या निदर्शनास आली. त्यामुळे कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीवेळी कंपनी अधिकार्‍यांनी काही दुकानांची यादी न्यायालयात सादर केली. संबंधित दुकानांची तपासणी करण्याची संमती न्यायालयाने दिल्यानंतर कंपनी अधिकार्‍यांनी विविध ठिकाणी मोबाईल दुकानांवर छापे टाकले. त्यानुसार, पिंपरी कॅम्पातील आणि पुण्यातील बुधवार पेठेतील मोबाईल मार्केटमधील काही दुकानांवर बुधवारी दुपारी एकाच वेळी छापे घालण्यात आले. या दुकानांमधून मोबाईलचे साहित्य जप्त करण्यात आले. दुकानांवर छापासत्र सुरू होताच काही दुकानदारांनी दुकान बंद करून पळ काढला.
पुढे आणखी वाचा...
बातम्या आणखी आहेत...