आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौंडजवळ दुरांतो एक्सप्रेसची ट्रॅक्टरला धडक, तीन ठार, 10 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दौंडजवळील खामगाव येथे दुरांतो एक्सप्रेसने रेल्वेमार्ग ओलांडणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबरी धडक बसल्याने तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, किमान 10 जण यात गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हैदराबादहून मुंबईकडे येणा-या दुरांतो एक्स्प्रेसला आज खामगाव, दौंड येथे फाटक उघडे राहिल्याने अपघात झाला. गेटमनकडून गेट उघडे राहिल्याने हा अपघात घडला आहे. स्थानिक प्रशासन आणि रेल्वेने याची दखल घेतली असून जखमींवर तत्काळ दौंड आणि हडपसर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी अपघाताची चौकशी रेल्वे आणि स्थानिक प्रशासन करीत असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्रॉलीमध्ये 10 ते 15 ऊसतोड मजूर बसलेले होते. तसेच जास्त लोक असल्याने तो ट्रालीत मागे बसले होते. मात्र, त्याचवेळी रेल्वेमार्गावरून दुरांतो एक्सप्रेस येत होती. टॅक्टर चालकाला रेल्वेच्या वेगाचा अंदाज आला नाही. त्यामुळे टॅक्टरच्या मागील बाजूच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्यात ट्रॉली वेगाने बाजूला फेकली गेली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर, 8-10 जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.