बारामती - भाषण करताना तोलून-मापून बोला, असा सबुरीचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना देत टीकाकारांच्या आरोपांचे खंडन करण्याची मुभा दिली, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागतो, असे सांगितले. मात्र, दोनच तासांत पुढील सभेत पुढचे पाठ मागचे सपाट करत वरकुटे (ता. इंदापूर) येथील शेतकरी मेळव्यात महायुतीवर टीका करताना अजित पवार पुन्हा घसरले.
पवार म्हणाले, अनेक जण व्यासपीठावर आसूड फिरवतात. त्यांच्याकडे बिनवादीचा आसूड आहे, तर माझ्याकडे वादीचा (पुढे कातड्याचा भाग) आसूड आहे. एकेकाला सटकवतोच, अशी फटकेबाजी करत शरद पवारांचा आसूड घेऊन राजकरण करून चालत नाही, असे सांगत त्यांच्या सूचनेलाही दादांनी छेद दिला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीचा प्रचार करा. प्रत्येक मत महत्त्वाचे असून आपल्याला त्यांची (काँग्रेसची) मदत हवी असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.