आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भूकंपाचा सौम्य धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहर परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जमिनीखाली पाच किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू आढळला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3 एवढी होती.

हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केल्यावर भूकंपाच्या केंद्रबिंदूचे स्थान 18.5 उत्तर अक्षांश आणि 73.8 पूर्व रेखांश असे असल्याचे स्पष्ट झाले. या धक्क्याने कोणतीही हानी झालेली नाही. पुण्याचा मध्यवर्ती भाग, शिवाजीनगर, दिघी, भोसरी, विश्रांतवाडी येथे हा धक्का जाणवला. भोसरीत लष्कर दारूगोळा कारखाने असल्याने तेथे दारूगोळ्याचे सराव व चाचणी उपक्रम सुरू असतात. त्यामुळे येथे हादरे नित्याचे आहेत. मात्र मंगळवारी जाणवलेली भूगर्भातील हालचाल या हादर्‍यांपेक्षा निराळी होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली.