आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वजीत कदम, उद्योजक अविनाश भोसलेंचा बंगला आणि कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योजक अविनाश भोसले. - Divya Marathi
उद्योजक अविनाश भोसले.
पुणे- नामांकित उद्याेजक अविनाश भाेसले यांच्यासह त्यांचे जावई, भारती विद्यापीठाचे संचालक अाणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी छापे टाकून काही कागदपत्रे ताब्यात घेतली.

प्राप्तिकर विभागाचे पथक शुक्रवारी सकाळीच पुण्यात दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी भाेसले व कदम यांची निवासस्थाने व कार्यालयांवर छापे टाकल्याने खळबळ उडाली. याबाबत पुणे प्राप्तिकर विभागास काेणतीही माहिती नव्हती. या कारवाईत पुणे प्राप्तिकर विभागाचा सहभाग नव्हता. हे छापे काेणत्या कारणास्तव टाकण्यात आले आहेत याचा अद्याप खुलासा करण्यात अालेला नाही. बेहिशेबी मालमत्तेच्या अनुषंगाने हे छापे टाकण्यात अाल्याची चर्चा अाहे.
बातम्या आणखी आहेत...