आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच अभ्यास मंडळ; तज्ज्ञ समित्यांसह अभ्यास मंडळे बरखास्त करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शालेय इयत्ता ते कनिष्ठ महाविद्यालय, या सर्व शिक्षणक्रमात एकसूत्रता सलगता यावी, या उद्देशाने सर्व अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यासाठी एकच अभ्यास मंडळ आता असणार आहे. याविषयीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारीत हे मंडळ काम करेल.

याआधी पहिली ते आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक, संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून तयार केला जात असे. तर पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करत असे. नववी ते बारावीचा अभ्यासक्रम राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तयार करत असे. या तिन्ही संस्थांसाठी तज्ज्ञ समित्या, अभ्यास मंडळे, संपादक मंडळे, लेखनगट कार्यगट कार्यरत होते. अाता ही सारी मंडळे, समित्या बरखास्त करण्यात आली आहेत. त्याऐवजी पहिलीपासून बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम आणि पुस्तके एकाच अभ्यास समितीमार्फत तयार केली जाणार आहेत.

राज्यात एकच समिती
>बालभारतीमध्ये नेमलेल्याविषयनिहाय समित्या कायम ठेवण्यात येणार आहेत. या समित्यांमार्फत सहावी ते आठवीच्या नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करण्यात येणार आहेत. मात्र हळुहळू राज्यस्तरावर एका विषयासाठी एकच समिती असावी, यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून नियुक्त्या विचारीधीन आहेत. या समित्यांच्या पुनर्रचना समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली आहे.
-डॉ. पुरुषोत्तम भापकर, शिक्षण आयुक्त

समिती काय करणार
>पहिलीते बारावीचा अभ्यासक्रम ठरवून पुस्तके तयार करणे
>शिक्षण प्रशिक्षण, मूल्यमापन लोहसहभागाचे धोरण ठरवणे
>नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे
>अभ्यासक्रम केंद्रीय शिक्षण मंडळाच्या समकक्ष करण्यासाठी प्रयत्न करणे