आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effort Starts To Shiv Forts Incorporates In World Heritage

शिवदुर्गांचा समावेश जागतिक वारसात होण्‍यासाठी प्रयत्न सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पश्चिम घाटातील 39 स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला. त्यामधील चार स्थळे महाराष्ट्रातील होती. आता शिवछत्रपतींच्या गडकोटांचाही समावेश वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये होण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवदुर्गांचे नैसर्गिक तसेच सांस्कृतिक महत्त्व अधिक संशोधनपूर्वक, नेमकेपणाने आणि सुनियोजित पद्धतीने विशद करण्याची जबाबदारी मात्र राज्य सरकारसह अभ्यासकांची आहे.
यूएनईपीचे माजी संचालक आणि टेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष राजेंद्र शेंडे यांनी ही माहिती दिली. 2013 च्या 16 ते 27 जूनदरम्यान युनेस्कोची बैठक कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह येथे झाली. या वेळी राजस्थानातील सहा किल्ल्यांचा समावेश जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाराष्‍ट्रात शिवछत्रपतींनी उभारलेले दुर्ग वर्ल्ड हेरिटेज साइटच्या यादीत का समाविष्ट होऊ नयेत, हा विचार प्रकर्षाने जाणवला आणि त्यादृष्टीने प्रयत्नांना सुरवात केली, असे शेंडे यांनी स्पष्ट केले.