आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - पुण्यातील बिबवेवाडीचे शिवसेना शाखाप्रमुख दयानंद ऊर्फ देवा खांडेकर (वय 32) यांची किरकोळ वादातून रविवारी गुंडांनी हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
मजहर मकसूद शेख (वय 20), सुनील काकडे (22), रफिक बाबूलाल शेख (22), रफीक इब्राहीम शेख (25), प्रवीण प्रकाश पवार (26), सुनील राजू काकडे (25), राहुल प्रल्हाद नितनवरे (26) व सज्जाद मकबार शेख (20) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून त्यांच्या घराशेजारी राहणा-या एका महिलेची मजहर शेख, रफिक शेख व सुनील काकडे यांनी छेड काढली होती. याबाबत जाब विचारून दयानंद खांडेकर यांनी सुनील व मजहर यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून सदर आरोपींनी दयानंद व त्यांचा मुलगा सचिन यांना कोंढवा रस्ता येथील शिवशक्ती दुकानाजवळ गाठले. दयानंद यांना बेदम मारहाण करून रस्त्यावर पडलेले दगड डोक्यात घालून त्यांचा खून केला.
दरम्यान, या प्रकरणाचे सोमवारी पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी बिबवेवाडी पोलिस चौकीवर मोर्चा काढला होता. शिवसेनेचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर, आमदार नीलम गो-हे, आमदार महादेव बाबर व आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह सुमारे 150 शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिस अधिका-यांनी कारवाईचे आश्वासन देत मोर्चेक-यांना शांत केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.