आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 मुख्यमंत्री पाहिले तेव्हा नाही मग आताच आरोप कसे होतात- खडसेंचा CM वर निशाणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. - Divya Marathi
एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.
पुणे- मी राजकारणात मागील 40 वर्षापासून आहे. 8 मुख्यमंत्री पाहिले पण त्यांच्या काळात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. मग आताच वर्षा-दीड वर्षात हे कसे काय घडू लागले. कोणी कितीही काही करू दे मी मात्र प्रामाणिकपणे काम करत राहणार आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर राजकारणाची दिशाच वेगळीच असते, असे सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले.
 
एकनाथ खडसे आज पुण्यात आहेत. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होता. जाधवर ग्रुपतर्फे एकनाथ खडसे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर खडसे बोलत होते. त्यावेळी फडणवीस यांच्याविरोधात बॅटिंग केली.
 
एकनाथ खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार मिळालं म्हणजे एखाद्याचे करियर संपले असे मानतात. मात्र, मी तसे मानत नाही. मी तर ती कामाची पोचपावती मानतो. उलट ख-या अर्थाने माझ्या राजकीय करिअरला आता सुरुवात झाल्याचे मी मानतो. यापुढे मी शून्यातून विश्व निर्माण करेल, असे खडसे म्हणाले. माझ्यावर जे आरोप झाले त्यामुळे मी व्यथित आहे. या आरोपांमुळे मी मरणापेक्षाही वाईट जीवन पाहिले. मी लोकांमुळे तरलो. सरकारशी मला देणेघेणे नाही. अशा मंत्रिपदावर लाथ मारतो अशी दर्पोक्ती खडसेंनी केली.
 
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने खडसे गहिवरले. खडसे म्हणाले, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो. भाजपची काही काळापर्यंत उच्चवर्णियाचा पक्ष अशी ओळख होती. मात्र, मुंडेंनी भाजपला बहुजनापर्यंत नेत सर्वसमावेशक पक्ष केला. आताही आम्ही काही लोक मुंडे- महाजनांनी दाखवलेल्या वाटेवरूनच चालतो. आज गोपीनाथ मुंडे असते तर राजकारणाची दिशा काही वेगळीच असते असे सांगायला खडसे विसरले नाहीत. खडसेंच्या बोलण्यात वारंवार नाराजी दिसून येत होती. मात्र, तरीही त्यांनी आपल्या बोलण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हात टेकणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तसेच आगामी काळात त्यांच्याशी दोन हात करत राहू असेच सूचित केले. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती...
बातम्या आणखी आहेत...