बारामती - पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी ५ कोटींची रोख रक्कम निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी इंदापूरजवळ पकडली.ही रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे. भिगवण येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून ही रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कुर्डवाडी शाखेत नेण्यात येत होती. भरारी पथकाने इंदापूरजवळ केलेल्या कारवाईत ही रक्कम पकडण्यात आल्याने खळबळ उडाली.
औरंगाबादमध्ये १५ लाख जप्त
पोलिसांनी सिडको टी पॉइंट चौक येथे मंगळवारी दुचाकी स्वारांकडून १५ लाख रुपयांसह गंगाधर साळुंके व ज्ञानेश्वर हिंगे यांना ताब्यात घेतले. या दोघांनी
आपण अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी आहोत. बँकेची रक्कम कामगार चौक शाखेत जमा करण्यासाठी जात आहोत, असे सांगितले. पण त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ती मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन केली. दरम्यान, बँक अधिकारी प्रशांत शिंदे कागदपत्रांसह ठाण्यात आले व रक्कम बँकेची असल्याचे पटवून दिले.