आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electronic Media Develop Dictatorship, Arun Sadhu Critised

इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे हुकूमशाहीला चालना,ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘राजकारण जेवढे कुरूप तेवढाच मीडियाही कुरूप आहे. या मीडियाच्या हस्तक्षेपामुळे लोकशाही धोक्यात आली असून हुकूमशाहीला चालना मिळू लागली आहे,’ अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी रविवारी केली. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा लोकशाहीला सर्वाधिक धोका असून या मीडियामुळे फक्त गोंधळ वाढणार असल्याचे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनीही व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांच्या ‘चॅनल फोर लाइव्ह’ या कादंबरीचे प्रकाशन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साधू बोलत होते. डॉ. पटेल अध्यक्षस्थानी होते. ‘स्टार माझा’चे संपादक राजीव खांडेकर या वेळी उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक मीडियावर सडकून टीका करताना साधू म्हणाले की, आजचा मीडिया अजेंडा ठरवू लागला आहे. त्यामुळेच अनेक बड्या नेत्यांनासुद्धा या मीडियाकडे दुर्लक्ष करता येत नाही. मीडियाच्या वाढत्या हस्तक्षेपातून इतिहास बदलण्याचे चुकीचे काम होत आहे. बदललेल्या या मीडियाचे स्वरूप धक्कादायकच नव्हे तर भीतिदायक आहे. राज ठाकरे यांनीही साधू यांच्या भाषणाशी सहमती दर्शवली. ‘माझ्या मनातले विचार व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,’ असे सांगून राज यांनीही मीडियाबद्दलचे मत स्पष्ट केले. ‘इलेक्ट्रॉनिक मीडियात सनसनाटीपेक्षा वेगळे काही नाही. मुद्रित माध्यमे आजही चांगली आहेत. भावना भडकवण्यापेक्षा लोकांना विचार करायला प्रवृत्त करण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे,’ अशी अपेक्षा जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.
साधूंचे गुपित
‘सिंहासन, मुंबई दिनांक या कादंब-या लिहिल्यामुळे मी जणू काही राजकारणाचा गाढा अभ्यासक असल्याचे लोक मानतात. पण काही गुपिते मला सांगितली पाहिजेत. या कादंब-या मी लिहिल्या तेव्हा पत्रकार म्हणून माझी मजल फक्त महापालिकेच्या सभांचे वार्तांकन करण्यापर्यंतच होती. मंडई, क्राइमच्या बातमीदारीपलीकडे मी कधी गेलो नाही. मंत्रालयाच्या पोर्चमध्ये जाण्याचीही माझी हिंमत नव्हती,’ असे साधू यांनी सांगितले.