आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍यात ‘एनडीए’त चंदनचोराचे एन्काउंटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील राष्‍ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये चंदनचोरी करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास चार ते पाच चोरटे शिरले होते. याची चाहूल लागताच सुरक्षा अधिका-याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी सुरक्षा अधिका-यांनी केलेल्या गोळीबारात एका चंदनचोर ठार झाला.

कर्मास रणजित राजपूत (22) असे मृताचे नाव आहे. खडकवासला येथील एनडीए अकादमीत चंदनाची अनेक झाडे आहेत. गुरुवारी रात्री पाच जण चोरीच्या उद्देशाने अकादमीच्या परिसरात शिरले होते. त्यांना हटकणा-या सुरक्षा अधिकारी मनोज पांडे यांच्यावर चोरट्यांनी गोळीबार केला. पांडेच्या गोळीबारात राजपूत ठार झाला, तर चौघे फरार झाले.