आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: पहाटे तीनला झालेल्या अपघातात अप्पर जिल्हाधिका-यांचा मुलगा ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- डावीकडे मृत दिग्विजय बगाटे तर उजवीकडे जखमी अनिश निलुट)
पुणे- भरधाव चारचाकीवरील ताबा सुटल्याने झाडावर आदळून झालेल्या अपघातात नाशिकमधील अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. दिग्विजय बगाटे (20 ) असे त्याचे नाव आहे तर त्याचा मित्र अनिश निलुट (20) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सूस-लवळे रस्त्यावर सिम्बायोसिस कॅम्पसजवळ सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास झाला.
याबाबतची माहिती अशी की, नाशिकमध्ये कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी बगाटे यांचा मुलगा दिग्जिवजय ताथवडेतील जेएसपीएम संस्थेतील शाहू कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरींगच्या दुस-या वर्षात शिकत होता. रविवारी रात्री तो आणि त्याचा मित्र अनिश सूस येथे मित्राकडे गेले होते. तेथून सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास परतत असताना सूस-लवळे रस्त्यावरील सिम्बायोसिस कॅम्पसजवळ दिग्विजयचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चारचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात दिग्विजय आणि अनिश गंभीर जखमी झाले. दोघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दिग्विजयचा मृत्यू झाला तर अनिशवर उपचार सुरु आहेत.
बातम्या आणखी आहेत...