आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून मारहाण, अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रेमसंबंध जुळलेल्या तरुणीच्या घरच्यांनी, संबंधित तरुणास नाशिक येथे बाेलावून शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तसेच या घटनेनंतर प्रेयसीकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने या विद्यार्थ्याने हाॅस्टेलच्या खाेलीत गळफास घेऊन अात्महत्या केली. विशाल राजाराम साेनवणे (वय २१, रा. नाशिक) असे अात्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव अाहे. त्याचे वडील राजाराम साेनवणे यांनी याबाबत पाेलिसात फिर्याद दाखल केली अाहे. त्यावरून वैशाली ठाकरे, याेगिता ठाकरे, हनुमान ठाकरे, मंगेश ठाकरे, जितेंद्र ठाकरे, साेमनाथ देवरे, जितू खताळ (सर्व रा. साळसाणे, लासलगाव, नाशिक) यांच्याविराेधात चिंचवड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला.

विशाल हा चिंचवड येथील अभियांत्रिकी विद्यालयात तृतीय वर्षाचे शिक्षण घेत हाेता. त्याच्यासाेबत शिकत असलेल्या नाशिक येथील एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले हाेते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच साेमनाथ देवरे व इतरांनी विशालला नाशिक येथील गावी बाेलावून घेतले. त्यानंतर त्यास शिवीगाळ व लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने विशाल याने त्याचे चिंचवड येथील वसतिगृहाच्या खाेलीत १६ नाेव्हेंबर राेजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गळफास घेऊन अात्महत्या केली. अात्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने झालेल्या प्रकाराचा उल्लेख केलेला अाहे.