आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यामध्‍ये अमली पदार्थांची विक्री करणा-या इथोपियन नागरिकाला अटक; कोकेन, गांजा जप्‍त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वाघोली येथे अमली पदार्थाच्‍या विक्रीसाठी आलेल्‍या इथोपियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. फिलमन बरहान घेब्रमारीयम असे अटक करण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. त्‍याच्‍याकडून कोकेन, गांजा व एक दुचाकी असा 33,115 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे.

 

वाघोलीतील कॉलेज परिसरात लोणीकंद पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत एक परदेशी व्‍यक्‍ती अमली पदार्थाच्‍या विक्रीसाठी येत असल्‍याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यावर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीवर लोणीकंद पोलिस स्‍टेशनमध्‍ये अमली पदार्थ कायद्यानूसार कारवाई करण्‍यात आली आहे.  

 

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार सतिश जंगम, सुनिल ढगारे, विश्वास खरात, राजु पवार, शेख, रौफ ईनामदार, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसीन शेख, लक्ष्मण राऊत यांनी ही कारवाई केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जप्‍त करण्‍यात आलेला कोकेन, गांजा.... 

 

 

बातम्या आणखी आहेत...