आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Everest Climbers From Pune Felicitated At The Hands Of Babasaheb Purandare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एव्हरेस्टवीरांचे पुण्‍यात जल्लोषात स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे । जगातल्या सर्वोच्च शिखरावर पुणेकर गिर्यारोहकांनी पाऊल ठेवून जो इतिहास घडवला, त्या टीमचे कौतुक पुणेकरांनी रविवारी जल्लोषात केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते गिरिप्रेमी संस्थेच्या एव्हरेस्ट टीमचा नेता उमेश झिरपे आणि अन्य वीरांचा सत्कार करण्यात आला. गिरिप्रेमीच्या या पहिल्याच एव्हरेस्ट नागरी मोहिमेच्या यशाचे सारे श्रेय पुणेकर नागरिकांचे सहकार्य आणि आशीर्वाद यांचे आहे. हा अभिमानास्पद सार्थकाचा क्षण सा-यांच्या शुभेच्छांमुळेच मिळाला, अशी भावना उमेश झिरपे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या मोहिमेत कृष्णा ढोकळे, टेकराज अधिकारी, आशिष माने, चेतन केतकर, प्रसाद जोशी, राहुल येलंगे, रूपेश खोपडे, सुरेंद्र जालीहाळ या आठ वीरांनी प्रत्यक्ष समिट केले. आयत्या क्षणी आॅक्सिजन सिलिंडर बिघडल्याने शेवटच्या टप्प्यावरून आनंद माळी आणि गणेश मोरे यांना माघारी फिरावे लागले. मात्र प्रत्येकाने आपले सर्वस्व या मोहिमेसाठी पणाला लावले होते, असेही झिरपे म्हणाले. 16 मार्च 2011 रोजी पुण्यातून प्रस्थान केलेली ही मोहीम 19 मे रोजी पूसुमारास आपल्या ध्येयाप्रत पोहोचली.