आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतुचक्र फिरले : १४ महिन्यांपासून प्रत्येकच महिन्यात पाऊस, पीक नियोजनही कोलमडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फेब्रुवारी २०१४ पासून यंदाच्या एप्रिलपर्यंत प्रत्येक महिन्यातच राज्यात पाऊस किंवा गारपीट झाली आहे. पश्चिम युरोपातील किंवा विषुववृत्तावरील देशांप्रमाणे महाराष्ट्रही बारमाही पावसाचा प्रदेश बनल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या सलग १४ महिन्यांमध्ये दरमहा राज्यात कुठे ना कुठे पाऊस झाला. असे असले तरी राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढली तर नाहीच, पण अन्नधान्य उत्पादन आणि फळबागांचे नियोजन पुरते कोलमडले आहे.

जानेवारी २०१४ मध्ये राज्य कोरडे होते. फेब्रुवारीमध्ये राज्यातील ३६ पैकी १५ जिल्ह्यांत पाऊस पडला. मार्च ते जून या उन्हाळ्याच्या चार महिन्यांमध्येसुद्धा वेगवेगळ्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पाऊस किंवा गारपिटीचा तडाखा बसला. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये सर्वच जिल्ह्यांत पाऊस होता. पावसाळ्याचे महिने संपल्यावरही पाऊस थांबला नाही. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतच्या प्रत्येक महिन्यात पाऊस पडलेल्या जिल्ह्यांची संख्या ३० ते ३४ या दरम्यान होती. त्यामुळे यंदा हिवाळा फारसा जाणवला नाही.

मानवी हस्तक्षेपामुळे हवामानाचा समताेल बिघडला
हवामान बदलांमुळे समतोल बिघडला. त्याचाच हा परिणाम आहे. अाशिया खंडातील ६८ दशलक्ष हेक्टर, तर आफ्रिकेतील ५५ दशलक्ष हेक्टर जंगल तुटले अाहे. कार्बन डाय ऑक्साइड, मिथेन या घातक वायूंचे उत्सर्जन वाढतच आहे. परिणामी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने भूभागाकडे बाष्पयुक्त, गरम वारे येतात. या वाऱ्यांमध्ये उत्तरेकडून येणारे थंड वारे मिसळल्याने गारपीट, अवकाळी पाऊस होतो, असे हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले.

पावसाचा पॅटर्न विस्कळीत
नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीच्या डोंगररांगात ४०० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पाडतात. सोलापूर व नगर हे जिल्हे पर्जन्यछायेचे म्हणूनच सर्वात कोरडे. मराठवाड्यापासून पुढे पावसाचा जोर वाढतो. विदर्भ हमखास पावसाचा प्रदेश, मात्र पावसाचा हा 'पॅटर्न'ही विस्कळीत झाला आहे.
पुढे वाचा, सर्वच मोसमांत पाऊस...