आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Every Time Governement Oppressed Opponent Sound Vinod Tawade

विरोधकांनी आवाज उठवला की निलंबनाची कारवाई सरकार करते - विनोद तावडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘सिंचनातील गैरव्यवहारावर चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी नाही. विरोधकांनी आवाज उठवला की निलंबनाची कारवाई करुन त्यांची मुस्कटदाबी केली जाते. राजकीय कारणांवरुन विरोधकांना त्यांचे हक्क बजावू दिले जात नाहीत,’ अशी तक्रार विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी राज्यपाल के. शंकर नारायणन् यांच्याकडे केली.


तावडे यांच्यासह शेकापचे आमदार जयंत पाटील, भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथील राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे पन्नास मिनिटे चर्चा केली. सिंचन भ्रष्टाचाराचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देऊन सरकार चर्चेची परवानगी नाकारते, हे तावडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यपालांनी ही बाब संयुक्तिक नसल्याचे सांगितले. निलंबनाचे प्रमाण अधिक वाढल्याचेही त्यांनी मान्य केले. ‘विरोधी पक्षांचे हक्क अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले,’ असे तावडे यांनी सांगितले.