आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रॉसिटी कायद्यासाठी झटणाऱ्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, रविवारी रात्रीची घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - अॅट्रॉसिटी कायदा व अनुसूचित जाती-जमाती आरक्षणाच्या बचावासाठी  मोर्चेबांधणी करणारे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यावर तिघांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, गव्हाळे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
रविवारी रात्री गव्हाळे आपल्या कारने घरी जाण्यास निघाले असता तिघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे गव्हाळे यांनी गाडी थांबवून तिघांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी गव्हाळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तिघेही पळून गेले.
बातम्या आणखी आहेत...