आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी क्रिकेटर व अभिनेता सलील अंकोलाच्या पत्नीची पुण्यात आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माजी क्रिकेटर सलील अंकोला याच्या पत्नीने रविवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली. परिणिती असे तिचे नाव असून, पुण्यातील सॅलीसबरी पार्क भागातील गीता सोसायटीमध्ये राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येची कारण अद्याप समजले नाही. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
अंकोलापासून परिणिती (46) चार वर्षापूर्वी वेगळी झाली होती. तेव्हापासून ती आपल्या आई-बाबासमवेत पुण्यात राहत होती. परिणीताचे आई-बाबा एका लग्नसमारंभासाठी अहमदनगरला गेले होते तेव्हा घरात कोणी नसताना तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
परिणिती सलीलपासून वेगळी राहत असली तरी या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे परिणितीने घटस्फोट द्यावा यासाठी सलीलने तिच्यावर दबाव आणला असावा. त्या तणावातूनच परिणितीने आत्महत्या केली असावी अशी शक्यता परिणितीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. तसेच परिणितीच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी पुढे वाचा, परिणीताच्या आत्महत्येसंबंधी माहिती...