आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहादसाठी पतीने दोन वेळा विष देण्याचा प्रयत्न केला, पुर्वाश्रमीच्या मॉडेलचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी पति आरिफ (डावीकडे) आणि आरोप करणारी रश्मी (उजवीकडे) - Divya Marathi
आरोपी पति आरिफ (डावीकडे) आणि आरोप करणारी रश्मी (उजवीकडे)

मुंबई - येथील पूर्वाश्रमीची मॉडेल रश्मी हिने तिच्या पतीवर बळजबरी धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आण्यालाचा आरोप केला आहे. तिने असेही म्हटले आहे की, तो लव्ह जिहादसाठी हे सर्व करत आहे. रश्मीने धर्मांतर करण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला दोन वेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने म्हटले आहे. आरीफ आता दुसऱ्या एका हिंदु मुलीला बळजबरी धर्मांतर करायला लावत असल्याचेही तिने म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. 

 

माहेरून पैसे आणण्यासाठी आणायचा दबाव 
- रश्मी शाहबेजकर हिने 13 वर्षांपूर्वी आसिफ शाहबेजकर याच्याशी लग्न केले होते. 
- तिने आरोप केला की, लग्नानंतर काही दिवसांनी आसिफ तिच्यावर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकू लागला. तिने तसे केल्यानंतरही तो तिला मारहाण करायचा. आसिफने तिला दोनवेळा विष देऊन मारण्याचा प्रय्तनही केला. 


दुसऱ्या तरुणीचे आयुष्य करतोय उध्वस्त 
- रश्मीचे म्हणणे आहे की, आसिफने आधीच तिने आयुष्य उध्वस्त केले आहे. आता तो दुसऱ्या एका हिंदु तरुणीचे आयुष्य उध्वस्त करत आहे. प्रेमाचे नाटक करत तो तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणत आहे. यासंबंधीचे मॅसेजेसही आपल्याकडे असल्याचे ती तरुणी म्हणाली. तो हे सर्व लव्ह जिहादसाठी करतो असेही ती म्हणाली. 
- आसिफचा एक मित्र मुनीरही यात सहभागी असल्याचा आरोप तिने केला आहे. आसिफचे वय 47 वर्षे आहे, तर दुसऱ्या मुलाचे वय 28 वर्षे आहे. 


तक्रारीनंतर दिली जीवे मारण्याची धमकी 
- रश्मीने आरोप केला की, तिने पोलिसांत तक्रार केली तर आसिफ आणि त्याच्या मित्राने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 
- या सर्व आरोपांवर आतापर्यंत आसिफचे काहीही स्पष्टीकरण आलेले नाही. रश्मीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी आसिफ आणि त्याच्या 3 मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...