आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Examination Paper Of Twelfth Class Outside Sell,two Arrest

बारावीच्या पेपरची विक्री, दोघे जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारावी बोर्डाची बनावट प्रश्नपत्रिका विकतानाना दोन मुलांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी सांगवी येथे सापळा रचून अटक केली. सुरेश खेत्रे (20) व करण शर्मा (21) यांना अटक करून पोलिसांनी सांगवी चौकीत गुन्हा दाखल केला आहे.
लातूरहून दोन मुले बारावीची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी सांगवीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दोघे एका मुलास कागदपत्रे दाखवत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. पेपर विकणार होतो, असे त्यांनी सांगितले. करण पुण्यात एम.कॉम.ला असून, सुरेशने बारावीची परीक्षा दिलेली आहे.