आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाला ‘एक्सेलन्स’चा दर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाला केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने ‘आयुष सेंटर ऑफ एक्सेलन्स’चा दर्जा बहाल केला आहे. या अंतर्गत विभागाला केंद्राकडून साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानातून विभागात संशोधनाचे व्यापक उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती आरोग्यशास्त्र विभागाचे संचालक डॉ. भूषण पटवर्धन आणि कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. 

आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्र अाणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील आंतरविद्याशाखीय संशोधनांसाठी हा निधी भक्कम पाठबळ पुरवेल, असा विश्वास व्यक्त करून डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘भारतीय वैद्यकपद्धतीशी संबंधित आंतरविद्याशाखीय संशोधनास चालना देण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाईल. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर भारतीय वैद्यकपद्धतींच्या माध्यमातून उपचार पद्धतींचे प्रायोगिक प्रकल्प राबविणे, त्याद्वारे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक ते आंतरविद्याशाखीय संशोधन पुढे येण्यासाठी प्रयत्न केले जातील.’ पुणे विद्यापीठाने गेल्याच वर्षी आरोग्यशास्त्र विभागात ‘सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अॅंड इंटिग्रेटिव्ह हेल्थ या स्वायत्त संस्थेची स्थापना केली हाेती.