आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extra Three Days Rain Pour, Pune Observatory Forcasting

आणखी तीन दिवस बरसणार पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या तीन दिवसांपासून बरसत असलेला पाऊस आणखी तीन दिवस राज्यभर बरसत राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.


पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी, कोकणात, विदर्भ आणि मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राच्याही अनेक भागांत वरुणराजाने पुन्हा हजेरी लावली आहे. पुण्यात गेले तीन दिवस सायंकाळनंतर धुवाधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पाऊस कोसळत आहे. या क्षेत्राची तीव्रता अजून 48 ते 72 तास टिकून राहण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, जोरदार वारे यांसह पाऊस बरसतो आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची ही लक्षणे आहेत, अशी माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ संशोधक सतीश गावकर यांनी दिली.