आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा घरात राहत होते बाबासाहेब, येथे आजही आहेत त्यांची भांडी, खुर्ची, कपडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापरातील वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. - Divya Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापरातील वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत.

पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापरातील वस्तू पाहायला मिळतील अशी एक जागा पुण्यात आहे. माई आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पादत्राणांपासून त्यांना मिळालेले पुरस्कार येथे दान स्वरुपात दिले आहेत. पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठातील डॉ. आंबेडकर संग्रहालयात या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. 

 

काय खास आहे या संग्रहालयात?
- संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी मुजूमदार म्हणाल्या, याचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी 26 नोव्हेंबर 1996 रोजी केले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब यांच्या 280 वैयक्तिक वस्तू आहेत. 190 फोटो आणि 490 पुस्तके आहेत.

- माई आंबेडकर यांनी या सगळ्या वैयक्तिक वस्तू संग्रहालयाला दान दिल्या. यात पवित्र अस्थीकलश, त्यांनी ज्या बेडवर अंतिम श्वास घेतला ते बेड, ज्या खुर्चीवर बसुन संविधान लिहिले ती खुर्ची आदीचा समावेश आहे.  

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती व्हावी यासाठी या संग्रहालयात 5 हजार पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...