आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fadnavis At The Mercedes Benz Ind Inauguration Of Phase II Production At The Chakan Plant Pune

\'मेक इन इंडिया\'त महाराष्ट्र अग्रेसर- CM, चाकणमध्ये बेंझच्या फेज-2चे उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र राज्य उद्योगधंद्यासाठी पहिल्यापासून फेवरिट डेस्टिनेशन राहिले आहे. महाराष्ट्रात उद्योजकांना उद्योगासाठी लागणारी मदत सरकारकडून मिळते अशी विश्वासार्हता उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच 'मेक इन इंडिया'मध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
चाकण येथील मर्सिडिज बेंझच्या फेज-2 चे उद्‌घाटन आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, बाळा भेगडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारकडून उद्योजकांना मदत मिळते या विश्वासार्हतेमुळे देशी-विदेशी उद्योगपती आपल्या कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. स्थानिक कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातून कुशल कामगार निर्माण करावेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे पाहा, चाकणमधील मर्सिडिज बेंझच्या फेज-2 प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमाची छायाचित्रे....