आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात शासनमान्य महा ई सेवा केंद्रावर बनावट आधारकार्ड; चौघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चाकण येथे पैसे घेऊन बोगस आधारकार्ड काढून देणाऱ्या शासनमान्य महा ई सेवा केंद्राचा पर्दाफाश झाला आहे. शेतकरी कर्जमाफीत आधारकार्डचा घोळ कायम असताना हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

चाकण उद्योग नगरीचा विस्तार झपाट्याने वाढत असताना राज्य आणि परराज्यातून अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. शासनमान्य महा ई सेवा केंद्रात बनावट आधारकार्ड लिंकींग होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा महसूल, प्रांत आणि चाकण पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केला आणि बोगसगिरी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या.

 

सरकारी कामकाज करण्यासाठी याच महा ई सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आणि ही केंद्र तालुका गाव या स्थरावर सुरुही झाली मात्र याच महा ई सेवा केंद्रांवर अशी बोगस कामे सुरु झाल्याने प्रशासनांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. आधार कार्डसह पँनकार्ड, विविध प्रकारचे दाखले, प्रतिज्ञा पत्र अशी महत्त्वाचे दस्तऐवज या कार्यालयात तयार होतात.

बातम्या आणखी आहेत...