आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गिरीश बापट यांच्या नावे बनावट फेसबुक खाते; एक जण अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर महिलांचे अश्लील फोटो टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जुन्नर येथून अटक केली. ऋतुराज सावकार नलावडे असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला अाहे.  

‘नामदार गिरीश बापट’ या नावाचे नलावडे याने फेसबुक अकाउंट तयार करून त्यावर अश्लील फोटोही टाकले हाेते.  दरम्यान, नलावडे हा शेती करत असून त्याने अाजवर १८ बनावट अकाउंट उघडले हाेते. त्याच्या पत्नीला पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे.