आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात फॅमिली कोर्टाच्या उद्घाटन प्रसंगी वकिलांची खंडपीठासाठी घोषणाबाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात राज्यातील पहिल्या फॅमिली कोर्टाच्या स्वतंत्र इमारतीचे उद्घाटन झाले. - Divya Marathi
पुण्यात राज्यातील पहिल्या फॅमिली कोर्टाच्या स्वतंत्र इमारतीचे उद्घाटन झाले.
पुणे- पुण्यात फॅमिली कोर्टाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी वकिलांची उच्च न्यायालय खंडपीठ मागणीसाठी घोषणाबाजी केली. वकिलांनी खंडपीठावर बोलण्याचा आग्रह करताच, तुम्ही मुख्य न्यायमूर्तींना नीट माहिती द्या, अशी सूचना  मुख्यमंत्र्यांनी वकिलांना केली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते आज फॅमिली कोर्टाचे उदघाटन करण्यात आले. पुण्यात फॅमिली कोर्टाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी वकिलांची उच्च न्यायालय खंडपीठ मागणीसाठी घोषणाबाजी केली. वकिलांनी खंडपीठावर बोलण्याचा आग्रह करताच, तुम्ही मुख्य न्यायमूर्तींना नीट माहिती द्या, अशी सूचना  मुख्यमंत्र्यांनी वकिलांना केली. यावेळी रेवती मोहिते, पालकमंत्री गिरीश बापट, पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती शैलजा सावंत उपस्थित होत्या. फॅमिली कोर्टात येणाऱ्या लोकांना या ठिकाणी आल्यानंतर आनंद आणि शांती मिळाली पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी व्यक्त केले. राज्यात प्रथमच फॅमिली कोर्टसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. गेल्या 9 वर्षापासून या इमारतीचे काम सुरू होते. मुंबई, औरंगाबाद, नागपूरला फॅमिली कोर्टसाठी स्वतंत्र इमारत येणार असल्याचे न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...