आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीच व्हा स्वत:चे चिअर लीडर: प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचे तरुणाईला अावाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा- तुकारामनगरी (पिंपरी)- ‘अाजपर्यंत मी खूप उत्सव पाहिले, केले; परंतु असा उत्सव कुठेही हाेत नसल्याबद्दल मला अाश्चर्य वाटतंय. युवा वर्गाला साेशल मीडियाचे जास्त डिस्ट्रॅक्शन अाहे. साेशल मीडिया हा उपयुक्त अाहे; पण त्याच्या अाहारी जाता कामा नये,’ असा मैत्रीपूर्व सल्ला तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी साेमवारी तरुणाईला दिला. साहित्य संमेलनातील मंगेश पाडगावकर सभामंडपात तरुणाईने चेतनचे टाळ्या- शिट्ट्यांच्या गजरात जंगी स्वागत केले. जाता जाता ‘स्वत:च व्हा स्वत:चे चिअर लीडर व्हा’ असा युवकांना भावणारा संदेशही त्याने दिला. चेतन मंचावर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने मराठी भाषेतून बाेलायला सुरुवात करताच तरुणाईने त्याला जबरदस्त दाद दिली. ताेडक्या-माेडक्या मराठीत ताे म्हणाला, ‘प्रेमाला नसते भाषेचे कुंपण, इथे असते मनाचे गुंफण... मराठी भाषेचा एवढा माेठा फेस्ट हाेताे याचे विशेष वाटते. अाजपर्यंत जयपूरमध्ये मी सगळ्यात माेठा उत्सव बघितला हाेता. पण हा उत्सव त्यापेक्षाही माेठा असल्याचा अानंद हाेत अाहे.’
मी एक विश्वासाने सांगू शकताे, इथे जे अाहेत त्यांची ‘अाैकात’ ते समजतात त्यापेक्षा अधिकच अाहे. तुम्ही अातल्या अावाजाला साद द्या, अापल्या संस्कृतीवर प्रेम करा. पण दुसऱ्यांच्या संस्कृतीला दाेष देऊ नका, असे अावाहनही त्यांनी केले.
मुलांना बर्ड नव्हे, अाता अँग्री बर्डच माहिती
युवा वर्गाचे साेशल मीडियाच्या बाबतीत डिस्ट्रॅशन वाढले अाहे. माझं मुलंही माझ्यापेक्षा स्मार्टफाेन, काॅम्प्युटर वापरण्यात तरबेज अाहेत. अाज घराेघरची मुलं फेसबुकवर तास‌्तास बसतात. अापण जेव्हा लहान हाेताे तेव्हा कधीकधी बाेअर व्हायचाे; पण अाताच्या मुलांना बाेअर हाेत नाही. ते काही तरी करत असतात. मला वाटतं की, बाेअर झालं की, काही तरी क्रिएटिव्ह हाेत असतं. अाजची छाेटी मुलं किंवा तुमच्यापैकीही काही जण मासे, चिमणी विसरली असतील. त्यांना बर्डस‌् नव्हे पण अँग्री बर्डस‌् माहिती असतं. हे सगळ प्रचंड वेगाने घडतं अाहे. गेल्या दहाच वर्षांत हा बदल झालेला अाहे. याचे जसे चांगले फायदे अाहेत तसे ताेटेही अाहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.