आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद जोशी यांच्यावर पुण्‍यात उद्या दुपारी 1 वाजता अंत्‍यसंस्‍कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीमध्ये प्राण फुंकण्याचे काम शरद जोशी यांनी केले होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात मंगळवारी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव 9 ते 12 या वेळेत डेक्कनमधील नदीपात्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जोशी यांच्या दोन्ही मुली व जावई अमेरिकेतून पुण्यात दाखल झाले आहेत.
शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून अखेरपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांना हक्क मिळावा यासाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना दखल घ्यायला वारंवार भाग पाडले होते. 2004 ते 2010 या कालावधीमध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची वर्णी लागली. त्या काळातही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम ते करत राहिले.
- वय : ८१ वर्षे

- निधन : राहत्या घरी सकाळी ९ वाजता

- पश्चात : दोन मुली श्रेया शहाणे, कॅनडा व
डॉ. गौरी जोशी, अमेरिका
शेतकरी बंधूंना आवाहन
जोशी यांच्या दोन्ही कन्या आल्यावर मंगळवारी होणाऱ्या अंत्यसंस्काराविषयीचे तपशील ठरतील. वेळही नंतर कळवू. त्यामुळे शेतकरी बंधूंनी पुण्याकडे येण्याची घाई करू नये, असे शेतकरी संघटनेचे आवाहन आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, शदर जोशी यांच्‍या जीवनपट... आठवणी... मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केलेल्‍या शोक संवेदना...