आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात माजी राष्ट्रपतीच्या नातेवाईकांच्या घरी चोरी, 3 लाखांची रोकड लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या एका नातेवाईकाच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आकुर्डी येथे राहणारे नरेंद्रसिंग पाटील असे त्यांचे नाव आहे. ते कामानिमित्त दिल्लीला गेले असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून घर बंद होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरटयांनी तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नातेवाईक नरेंद्र पाटील आकुर्डीमधील पूजा अपार्टमेंट येथे राहातात. ते पंधरा दिवसांपासून परिवारासह दिल्लीत आहेत. त्यांचे घर बंद असल्याने चोरांनी त्यांच्या घरी चोरी केल्याचे उघड झाले आहे. दरवाज्याची काडी तोडून घरातील 3 लाख रुपयांची रोख रक्कम चोरटयांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घरात ठेवलेले सोन्याचे दागिने मात्र सुरक्षित आहे. कदाचित चोरटयांची त्यावर नजर पडली नसावी. पंधरादिवसांपासून घरी कुणी नसल्यामुळे प्रकार आज समोर आला आहे. निगडी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पुढील स्लाइडवर पाहा... संबंधित फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...