आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातून 10 फुटी रस्ता गेल्याने मावळमध्ये विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- शेतातून रस्ता जात असल्याने मावळमधील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना आज (शनिवारी) मोरमारेवाडी येथे सकाळी घडली. बजरंग मारुती मोरमारे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोरमारेवाडीपासून काही अंतरावर वांडरवाडी आहे. येथे जाण्यासाठी रस्ता नाही. येथील नागरिकांनी पाठपुरवठा करून तहसीलदारांकडून रस्ता मंजूर करून घेतला होता. 10 फुटाचा रस्ता हा बजरंग मारुती मोरमारे यांच्या शेतातून जात होता. यावरून मोरमारे आणि वांडरवाडीतील नागरिकांची वाद ही झाले होते. या कारणावरून गुरुवारी विषारी औषध प्राशन केले होते. नंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.

कामशेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आय.एस.पाटील पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...