Home | Maharashtra | Pune | Farmer suicides, Baramati

बारामती: शेतकऱ्याचा दहावा बँकेच्या दारासमाेरच, वायनरीमुळे आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याचा टाहो

प्रतिनिधी | Update - Jun 04, 2016, 01:59 AM IST

इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी (काझड) येथील नामदेव लक्ष्मण झगडे (वय 55) या शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी रात्री आत्महत्या केली. नामदेव यांनी युको बँकेच्या बारामती शाखेमधून 2007 मध्ये वायनरी द्राक्ष लागवडीसाठी 4 लाख रुपये कर्ज घेतले होत. 2008 मध्ये वायनरी द्राक्षाचे उत्पादन तयार झाल्यानंतर वायनरी द्राक्षांचे दर प्रचंड घसरल्याने वायनरी उत्पादक शेतक-यांची द्राक्ष शेती अ

 • Farmer suicides, Baramati
  बारामती - बँक व वायनरी कंपनीने कराराद्वारे द्राक्ष खरेदीचे अामिष दाखवल्याने कर्ज काढून द्राक्षांचे उत्पादन घेतले. मात्र, नंतर संबंधित कंपनीने माल खरेदीस नकार दिल्यामुळे खचून गेलेल्या काझड येथील शेतकऱ्याने जिवापाड जपलेली द्राक्षबागच ताेडून टाकली. मात्र, अार्थिक विवंचनेत अडकलेल्या या शेतकऱ्याकडे बँकेने कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यामुळे दहा दिवसांपूर्वी अात्महत्या केली, असा अाराेप स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केला अाहे. संबंधित बँक अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शुक्रवारी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी बारामतीत बँक शाखेसमाेरच दशक्रिया विधी करून अनाेखे अांदाेलन केले.

  सन २००६ मध्ये युको बँक, छाटू इंडिया (नारायणगाव) या वाईन उत्पादक कंपनीने करारान्वये काझड (ता. इंदापूर) भागातील अनेक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देऊन द्राक्ष उत्पादनासाठी प्राेत्साहित केले. वायनरी द्राक्षाच्या विक्रीतून शेतकरी बँकेचे हप्ते फेडणार होते. यापैकी अल्पभूधारक शेतकरी नामदेव लक्ष्मण झगडे (रा. काझड) यानेदेखील बँकेच्या कर्जातून अापल्या शेतात वायनरी द्राक्षांचीची लागवड केली. मात्र, एकदाच वायनरी द्राक्ष घेतलेल्या सदर कंपनीने पुन्हा मात्र खरेदी करण्यास नकार दिला. तेथूनच नामदेवची परवड सुरू झाली. कर्ज काढून जगवलेली वायनरी द्राक्षे विकत घ्यायला काेणी तयार हाेईल. त्यामुळे नाइलाजास्तव, काळजावर दगड ठेवून त्यांनी द्राक्षाची बाग ताेडली. मात्र, थकीत कर्ज काही ते फेडू शकले नाहीत. नंतर पिकवलेल्या उसाचे पैसेही बँकेने कर्जाची परतफेड म्हणून कापून घेतले, त्यामुळे अार्थिक अाेढाताण हाेऊ लागली. थकबाकी वसुलीसाठी युकाे बँकेने नेमलेले एजंट दमदाटी करत असल्याचा नामदेवच्या कुटुंबीयांचा अाराेप अाहे. इतकेच नव्हे, तर बँकेच्या नाेटीस बाेर्डवर थकबाकीदार म्हणून नामदेवचा फाेटाेही लावल्याची त्यांची तक्रार अाहे. याच वैफल्यातून त्याने २५ मे राेजी विष घेऊन अात्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे अाहे. त्यांच्यामागे पत्नीसह नितीन, प्रदीप व चैत्राली ही अपत्ये अाहेत. दुष्काळी परिस्थितीत कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अाता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली अाहे. बँक अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी नामदेवच्या मुलांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नामदेवच्या दहाव्याचा कार्यक्रम चक्क बँकेच्या दारासमाेरच करून अांदाेलन केले.

  तगादा लावला नाही
  सन २००५ मध्ये नामदेवने अामच्या बंॅकेकडून दीड लाख रुपये मध्यम मुदतीचे व ५० हजार रुपये पीककर्ज घेतले हाेते. वर्षभरानंतर हे कर्ज नवं जुनं करण्यात अाले. २०१३ -१४ मध्ये गारपिटीमुळे त्यांच्या शेतीचे माेठे नुकसान झाले. त्यानंतर कर्ज थकले हाेते. हे पैसे फेडण्यासाठी नामदेवने डिसेंबर २०१७ मुदत मागितली हाेती. मात्र त्यांच्याकडे वसुलीसाठी बंॅकेने कधीच तगादा लावला नाही.
  एकाग्र प्रकाश त्यागी, वरिष्ठ व्यवस्थापक, युको बँक, बारामती शाखा

  अच्छे दिन काेणाला?
  मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे लोण अाता पश्चिम महाराष्ट्रातही आले आहे. सरकार ९ हजार कोटी रुपये बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याला मोकळे सोडून देशातील अन्नदात्या शेतकऱ्याला ४५ हजार कोटींची कर्जमाफी नाकारत अाहे. बडे उद्योजक, व्यापाऱ्यांना कर्जात भरघोस सवलत मिळते. शेतकऱ्याला का नाही... मग हे अच्छे दिन कोणाला आले आहेत?
  राजेंद्र ढवाण पाटील, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
 • Farmer suicides, Baramati
  नामदेव यांनी युको बँकेच्या बारामती शाखेमधून 2007 मध्ये कर्ज घेतले होते.
 • Farmer suicides, Baramati
  नामदेव यांनी वायनरी द्राक्ष लागवडीसाठी 4 लाख  रुपये कर्ज घेतले होते.
 • Farmer suicides, Baramati
  वायनरी द्राक्षांचे दर घसरल्याने त्‍यांची शेती अडचणीत आली.
 • Farmer suicides, Baramati
  बँकेने थकबाकीदारांचे फोटो बँकेत लावले आहेत.
 • Farmer suicides, Baramati
  बँकेकडून होणारे मानसिक खच्‍चीकरण सहन न झाल्‍याने नामदेव यांनी टोकाचा निर्णय घेतला.
 • Farmer suicides, Baramati
  नामदेव यांच्‍या आत्‍महत्‍येच्‍या निषेधात कुटुंबियांनी बॅंकेसमोरच दशक्रियाविधी केला.

Trending