आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानगावातून शेतकरी संपाचा एल्गार, 100 गावांचा पाठिंबा; ऊस-कापूस उत्पादक अाक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानगाव (ता. दाैंड) येथे शुक्रवारपासून शेतकरी संपाला सुरुवात झाली. - Divya Marathi
कानगाव (ता. दाैंड) येथे शुक्रवारपासून शेतकरी संपाला सुरुवात झाली.
पुणे- अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यात एेतिहासिक संपाचे हत्यार उपसले होते. या संपाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. मात्र या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नसलेल्या पुणे जिल्ह्यातील कानगाव (ता. दाैंड) येथील शुक्रवारपासून बेमुदत शेतकरी संपाला सुरुवात केली अाहे. या अांदाेलनाला राज्यभरातील १२० गावांनी पाठिंबा दर्शवला अाहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कानगावमध्ये हजेरी लावत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला अाहे.    दुसरीकडे, विदर्भातील वाशिम व बुलडाणा व पश्चिम महाराष्ट्रातील काेल्हापूर जिल्ह्यातही अनुक्रमे कापूस व दूध उत्पादकांनी याेग्य दरासाठी अांदाेलन केले.

कानगावचे सरपंच संपत फडके म्हणाले, कानगाव येथे सर्व गावकऱ्यांनी मिळून ग्रामदैवत भवानी मातेला दुग्ध अभिषेक घालून संपाची सुरुवात केली. त्यानंतर गावातून महिला, पुरुष, विद्यार्थी यांची माेठी रॅली काढत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात अाला. शुक्रवारी गावातील सुमारे तीन हजार लिटर दूध गावातून बाहेर बाजारात विक्रीसाठी न पाठवता त्याचा खवा करण्यात अाला.  दूध गावातील लाेकांना वाटप करण्यात अाले. गावात कडकडीत बंद पाळण्यात अाला. शेतकऱ्यांनी संप सुरू केल्याने दाैंडचे तहसीलदार बालाजी साेमवंशी यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली असता त्यांना निवेदन देण्यात आले. साेमवंशी यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून शेतकऱ्यांच्या भावना सरकार दरबारी पाेहोचवल्या जातील, असे सांगितले. मात्र, अद्याप सरकारतर्फे चर्चेचा प्रस्ताव अाला नसल्याचे सरपंच फडके यांनी सांगितले.
 
काय अाहेत शेतकरी संघटनेच्या मागण्या   
शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघेल इतका हमीभाव ठरवून मिळावा, सरसकट कर्जमाफी करावी,शेती कर्ज हे शासकीय जमीन मूल्यांकनाच्या ८० टक्के मिळावा याचा व्याजदर तीन टक्के असावा अाणि ते पाच ते दहा वर्षे दीर्घ मुदतीचे असावे, वयाच्या ५० वर्षांनंतर प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा पाच हजार निवृत्तिवेतन मिळावे, अपंग शेतकरी व महिला खातेदारांना दिवाळी बाेनस दहा हजार रुपये द्यावा, अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना माेफत शिक्षण देऊन नाेकरी द्यावी, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या  आहेत.
 
अांदाेलनात सुकाणू समिती सहभागी नाही   
शेतकरी अाक्राेश कृती समितीचे सदस्य माउली शेळके म्हणाले, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष अजित नवले तसेच सदस्यांना कानगावमधील राज्यव्यापी शेतकरी संपाची माहिती देण्यात अाली. मात्र, संप करण्यासाठी तयारी करावी लागेल. कानगावमधील शेतकऱ्यांनी संपाची तारीख बदलावी, असे त्यांच्याकडून सांगण्यात अाले.   ग्रामसभेत संप करण्याची तारीख ठरवल्याने बदलता येत नसल्याने ठरलेल्या दिवशी संप सुरू केला. त्यात शेतकरी कृती समिती अद्याप सहभागी झालेली नाही. शेतकरी अात्महत्या करत असताना सरकार झाेपेचे साेंग घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
विदर्भातील शेतकरीही उतरले रस्त्यावर
सोयाबीन व कापसाला याेग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस व सोयाबीन फेकून अांदाेलन करण्यात अाले. या वेळी सरकारविराेधात घाेषणाबाजीही करण्यात अाली.   कापसाला सात हजार व सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव न दिल्यास मराठवाडा व  विदर्भात  आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला अाहे. वाशिम शहरातील अाठ महिन्यापासून बंद असलेले दूध केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठीही शुक्रवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय दूध केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो लिटर दुध फेकून सरकारविराेधी संताप व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...