आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Leader Sadabhau Khot Arrested In Farmers Cheating Case

\'स्वाभिमाना\'ला धक्का: शेतक-यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- धुळे येथील साक्री तालुक्यातील दूध उत्पादक शेतक-यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना आज अटक करण्यात आली. आज दुपारी खोत हे पोलिसांत हजर झाले व त्यांना अटक करण्यात आली.
सदाभाऊ खोत हे 2009-10 मध्ये देवकीनंदन दूध डेअरीचे अध्यक्ष होते. त्यावेळी शेतक-यांना गाई-म्हशी विकत घेण्यासाठी स्टेट बॅंकेच्या मदतीने कर्ज देऊ असे सांगितले होते. त्यानुसार खोत यांनी शेतक-यांच्या नावावर प्रत्येकी 30 ते 35 हजार (एका म्हशीची किंमत) अशी कर्ज मंजूर करून घेतली. मात्र त्यानंतर बहुतांश शेतक-यांना गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी पैसेच दिले गेले नाहीत. या प्रकरणात खोत यांनी धुळ्यातील स्टेट बॅंकेच्या अधिका-याला हाती धरून अपहार केला होता.
याप्रकरणी साक्री तालुक्यातील राजधर पाटील या शेतक-याने जून 2013 मध्ये खोत यांच्यासह बॅंक अधिका-याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी करीत खोत यांच्यासह बॅंक अधिकारी सुभाष विवरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विवरीकर यांना अटक करण्यात आली होती. तर, खोत यांनी धुळ्यातील सेशन कोर्टात व नंतर औरंगाबाद खंडपीठाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दोन्ही ठिकाणी खोत यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे खोत यांना पोलिसांपुढे शरण येण्यावाचून पर्याय नव्हता.
खोत यांना अटक झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानालाच धक्का व माढ्यातून दावेदारी कमकूवत होणार... वाचा पुढे...