आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरीच उभारणार शरद जोशींचे स्मारक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत शरद जाेशी यांचे अंगारमळा (जि. पुणे) येथे स्मारक उभारण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात अाला. संघटनेच्या न्यासाची बैठक गुरुवारी बाेपाेडी येथे झाली. या वेळी रामचंद्र पाटील, भास्करराव बोरावके, सुरेशचंद्र म्हात्रे, बद्रीनाथ देवकर, गोविंद जोशी, वामनराव चटप, अनंत देशपांडे, संजय पानसे आणि अलका दिवाण या विश्वस्तांची उपस्थिती हाेती.

शरद जोशींच्या दोन्ही कन्या श्रेया गौरीही उपस्थित होत्या. या बैठकीत शेतकरी संघटनेच्या सद्य:स्थितीचा अाढावा घेऊन विस्तारित कार्यकारिणीची बैठक ३१ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शेतकरी संघटनेच्या नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येईल. तसेच आंबेठाण येथील अंगारमळ्यात भारतातील शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान ठरेल असे जाेशींचे भव्य स्मारक शेतकऱ्यांच्या सहभागातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष रवी काशीकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...