आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण सोडले, आता सरकारशी होणार चर्चा, विद्यार्थ्यांना निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे ; भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटवावे, या मागणीसाठी एफटीआयआयचे तीन विद्यार्थी १७ दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले होते. त्यांना रविवारी केंद्रीय माहिती व परराष्ट्र मंत्रालयाने चर्चेच्या निमंत्रणाचा मेल पाठवला. त्यामुळे या उपोषणाची सांगता झाली असून, २९ सप्टेंबरला ही चर्चा होणार आहे.
गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी एफटीआयआयमधील विद्यार्थी गेल्या साडेतीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, केंद्र सरकार कोणतीही कारवाई न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अभिजित दास याने ६६ तास उपोषण केले होते.
... पण संप कायमच
रविवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयाकडून आम्हाला ई-मेल आला. त्यात चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही हे उपोषण मागे घेत आहेत. मात्र, बंद कायमच आहे. विकास अर्स, विद्यार्थी