आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात जन्मदात्या पित्याकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्‍यात जन्मदाता पिता आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील चिंचवड परिसरात एका 17 वर्षीय मुलीने तिच्या जन्मदात्या पिताच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा पिता तिचे गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक शोषण करत होता. त्याला विरोध केल्यास तिला जिवे मारण्‍याचीही धमकी देत होता. पीडित मुलीने दोन महिन्यांपूर्वी तिच्या आईला आपबिती सांगितली होती. परंतु आरोपीने पीडित मुलीसह तिच्या आईला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली होती. एवढेच नाही तर अन्य आपल्या दोन अल्पवयीन मुलींवरही बलात्कार करण्याची धमकी दिली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'एक बलात्कारी बाप आणि त्याची पीडित मुलगी'