आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ‍िनाइल अ‍ॅसिड इतकेच धोकादायक असल्याचा निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हेल्थइंडियाने मुंबई पुण्यातील २०० डॉक्टरांच्या २०० नागरिकांच्या दृष्टीकोनातून घरोघरी सुरक्षित जंतुनाशक म्हणून वापरले जाणारे फ‍िनाइल हे सुरक्षित आहे का, याचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात फ‍िनाइल हे अ‍ॅसिडइतकेच धोकादायक असून त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची माहिती हेल्थ इंडियाच्या डॉ. मंजिरी चंद्रा डॉ. डी. वाय. पाटील मेडकिल महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शरद आगरखेडकर यांनी गुरुवारी दिली.

डॉ. चंद्रा म्हणाल्या, फ‍िनाइल हे आपले यकृत, मूत्रपिंड, डोळे त्वचेचे नुकसान करू शकते आणि वर्षानुवर्षे हाताळल्यास, हुंगल्यास अथवा शरीरात जात राहिल्यास त्याचा श्वसनसंस्था, अभिसरण संस्था चेतासंस्थेवर गंभीर दुष्परिणाम होतो. सर्वेक्षणादरम्यान आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानकि अहवालांचा अभ्यास केला. जुन्या काळापासून वापरात असलेली अ‍ॅसिड, फ‍िनाइल, यासारख्या जंतुनाशकातून आरोग्यावर तीव्र परिणाम घडत असल्याचे अहवालात समोर आले आहे.

फ‍िनाइल सहजतेने घरात हाताळले जाणे धोकादायक असून ते सुरक्षितरीत्या वापरणे गरजेचे आहे. या रसायनांचा त्वचा डोळ्यांशी संपर्क येऊ देणे टाळावे. बाजारातील जंतुनाशकावर लेबलिंग अनिवार्य नसल्याने कोणतेही नियम पाळता धोकादायक उत्पादने वकिली जात असून त्यापासून नागरिकांनी सावध राहावे.