आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अायकर अधिकाऱ्याला 31 लाखांचा गंडा, मुलीच्‍या महाविद्यातील प्रवेशासाठी उकळले पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- मुलीला पुणे येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली  खामगाव येथील आयकर अधिकारी रूपा धांडे यांची ३१ लाख ४० हजार ५५ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या दृष्टी फाउंडेशनच्या ५ जणांविरुद्ध खामगाव शहर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
धांडे यांच्या प्रेरणा नामक मुलीला पुणे येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी नवी दिल्ली येथील दृष्टी फाउंडेशनचे संचालक पीयूष रामचंद्र सैनी, व्यवस्थापक मनोज पाठक, लिपिक अभिमन्यू, सुपरवायझर नीलिमा पीयूष सैनी व मलैका पीयूष सैनी या पाच जणांनी २६ नोव्हेंबर २०१४  ते २९ डिसेंबर २०१४ दरम्यान धांडे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून ३८ लाख ४० हजार ५५ रुपये उकळले.
 
सदर रक्कम धांडे यांनी ३० डिसेंबर २०१४ ते २४ जानेवारी २०१६ या काळात वरील आरोपींच्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसने दिली. मात्र यानंतरही धांडे यांच्या मुलीला प्रवेश न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपींना पैसे परत मागितले. त्यावर अाराेपींनी ३८ लाखांपैकी फक्त ७ लाख रुपये परत दिले व ३१ लाखांची फसवणूक केली.
बातम्या आणखी आहेत...