आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics & Video: पत्नीशी अनैतिक संबंध असल्यावरून तरुणाच्या डोक्यात घातला दगड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो व तिच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून शेजारी राहणा-या तरूणाच्या डोक्यात फरशी घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मध्यवस्तीतील दांडेकर पूलाजवळील राजेंद्रनगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जखमी झालेला तरूण व हत्येचा प्रयत्न करणारा आरोपी एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी-शेजारी राहतात हे विशेष. दरम्यान, या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बातमीसह हे फुटेज आम्ही जोडले आहे.
धनंजय शिवाजी मोरे असे मारहाण करणा-याचे नाव आहे. तर जखमीचे अभिजित मच्छिंद्र मारणे असे नाव आहे. अभिजितवर सध्या पुण्यातील ससून रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारणे व मोरे राजेंद्रनगरमधील एका इमारतीत शेजारी शेजारी राहतात. अभिजित मारणे हा अविवाहित आहे. तो शेजारी राहणा-या मोरे यांच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो अशी तक्रार केली. याचा राग मनात ठेऊन महिलेचा पती शिवाजी मोरेंने मागील शनिवारी (25 एप्रिल रोजी) इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये अभिजितला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात फरशी घातली.
बेशुद्ध झालेल्या अभिजितच्या कंबरेवर, छातीवर, डोक्यावर आणि पायांवर मोरेने सात-आठ वेळा भला मोठा दगड घातला. दरम्यान हा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद होत होता. या घटनेनंतर इमारतीतील लोकांनी अभिजितला रूग्णालयात दाखल केले. अभिजितच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोरेला अटक केली मात्र, शिवाजी मोरेने दोन दिवसांत जामीन मंजूर करून घेतला. आता तो जामीनावर बाहेर आहे.
दुसरीकडे, अभिजितची प्रकृती गंभीर आहे. अभिजितचे शरीर लुळे पडले असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाले असून ते व्यवस्थित होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टराचे म्हणणे आहे असे त्याच्या वडिलांनी सांगितले. अभिजित वाचला तरी त्याला दोन्ही पायांचे कायमचे अपंगत्व येणार असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मच्छिंद्र मारणेंचा अभिजित हा एकुलता एक मुलगा आहे.
पुढे पाहा, या घटनेचा सीसीटीव्हीत कैद झालेला थरार...