आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानच्या पाडावानंतरचा अफगाणिस्तान पडद्यावर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तालिबानी राजवट संपुष्टात आल्यानंतर गेल्या दहा वर्षांतील अफगाणिस्तानमधील कलात्मक विचारांचे दर्शन घडवणारे वीस निवडक अफगाणी चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना 17 ते 19 मेदरम्यान मिळणार आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर, नॅशनल फिल्म अर्काइव्ह यांच्या संयुक्त सहकार्याने प्रथमच या चित्रपटांचा महोत्सव होणार आहे.

अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत एच. ई. शैदा महंमद अब्दाली यांच्या हस्ते 17 मे रोजी उद्घाटन होणार आहे. तसेच अफगाणिस्तानचे प्रसिद्ध फिल्ममेकर सिद्दीक बर्मक हेही उपस्थित राहतील. ‘ओपियम वॉर’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. तालिबान्यांची जुलमी राजवट आणि त्यानंतरचा अफगणिस्तान, तसेच गेल्या वीस वर्षांतील राजकीय, आर्थिक, सामाजिक स्पंदने टिपणारे चित्रपट महोत्सवाच्या आहेत.

काही लक्षणीय चित्रपट
ओपियम वॉर -उद्घाटनाचा चित्रपट, सिद्दीक बर्मक यांचा ओसामा, आतिक रहिमी यांचा अर्थ अँड अँशेस, महिला दिग्दर्शक रोया सदत यांचा थ्री डॉटस, द बॉय हू प्लेज ऑन ज बुद्धाज ऑफ बमियान, द बॉय मिर : टेन इयर्स इन अफगाणिस्तान, बुझकाशी बॉइज, द काइट रनर, गुड मॉर्निंग ग्रँडमा, द आयसी सन, सिटी ऑफ डस्ट, ए डे इन द लाइफ ऑफ पोस्टमन खान आघा अ लेटर टू लाइट