आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधींविरोधी \'देशभक्त नथूराम\' फिल्मवर बंदीच, पुणे कोर्टाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- नथूराम गोडसे)
पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसेच्या आयुष्यावर बनवलेल्या 'देशभक्त नथूराम' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पुण्यातील सत्र न्यायालयाने गुरुवारी बंदी घातली आहे. नथूरामच्या जीवनावर बनवलेला हा चित्रपट 30 जानेवारी रोजी रिलीज होणार होती. मात्र, चित्रपट बनवताच या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करीत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती.
अखिल भारतीय हिंदू महासभेला या प्रकरणातील प्रतिवादी बनवत हेमंत पाटील यांनी ही बंदीची याचिका दाखल केली होती. हेमंत पाटील यांनी या याचिकेत म्हटले होते की, या चित्रपटात महात्मा गांधींना हिंदू विरोधी दाखवले गेले आहे तर, नथूराम गोडसेला एक देशभक्ताच्या रूपात दाखवले आहे. हा चित्रपट समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करू शकतो. त्यामुळे अशा चित्रपटाबर केवळ बंदी घालणेच योग्य ठरेल. दरम्यान, पाटील यांच्या या याचिकेवर संपूर्ण चार महिने सुनावणी सुरु होती. याचिकाकर्त्याने अशीही मागणी केली होती की, या चित्रपटावर तोपर्यंत बंदी हवी जोपर्यंत या चित्रपटातील आपत्तीजनक दृश्य व संवाद हटवले जात नाहीत.
फक्त एकाच पक्षकाराची बाजू ऐकली-
या प्रकरणात दिवाणी मॅजिस्ट्रेट के एम पिंगळे यांनी केवळ एका पक्षकाराची उपस्थिती असतानाच हा आदेश दिला आहे. कारण प्रतिवादी हिंदू महासभेला नोटिस देऊन त्यांच्यावतीने कोणीही न्यायालयात हजर झाले आहे. न्यायालयाने यादरम्यान देशभक्त नथूराम हा चित्रपट पाहिला होता. तसेच दिग्दर्शक- निर्मात्यालाही आपले म्हणणे मांडायला सांगितले होते.
काय आहे या चित्रपटात-
या चित्रपटात गोडसेचे लहानपण, त्याच्या मनात देशाविषयी असलेली भावना, कौटुंबिक माहिती व त्याच्यातील माहित नसलेल्या चांगल्या बाबींवर प्रकाशझोत या चित्रपटात टाकला आहे. मात्र, या चित्रपटाद्वारे गांधी हत्येचे समर्थन केल्याचा संदेश जात असल्याचे बोलले जात आहे.