आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally Two Seats Exchange Between Ncp & Congress, Sharad Pawar Says At Pandharpur

रायगड राष्ट्रवादीकडे तर हातकणगंले- हिंगोली जागा काँग्रेस लढविणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादीत प्रदेश पातळीवरील नेत्यांनी जागावाटपावरून वाद निर्माण केल्यानंतर दिल्लीत तो शांततेत सोडविण्यात आला. पूर्वीचे म्हणजेज 26-22 हा फॉर्म्यूला कायम ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आल्यानंतर आता दोन जागांची अदलाबदल करण्यातही यश आले आहे. काँग्रेसने रायगडच्या बदल्यात हातकणगंले ही जागा स्वीकारली तर हिंगोलीच्या बदल्यात राष्ट्रवादीने जालन्याची जागा घेतल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपुरात वक्तव्य केले. याबाबत आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष याबाबत लवकरच घोषणा करतील असेही त्यांनी सांगितले.
रायगडमधून आता जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि जालन्यातून उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे हे निवडणूक रिंगणात असतील. त्यामुळे छगन भुजबळ व सुरेश धस यांच्यापाठोपाठ टोपे आणि तटकरे या चार विद्यमान मंत्र्यांना पक्षाने लोकसभेच्या रिंगणात उतरविल्याचे आता होत आहे. कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तसे संकेत दिले होते. ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते त्यामुळे पवारांनी ही जागा सोडली आहे. राष्‍ट्रवादीने वर्षभरापूर्वीच ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बहुतेक मंत्री दिल्लीत जाण्यास तयार नव्हते अशी चर्चा होती. अखेर पवार यांनी बेरजेचे राजकारण करीत विद्यमान चार मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी व्यवस्था केली आहे.
पुढे वाचा, पवारांच्या कोणत्या सूत्रामुळे काँग्रेसने केली अदलाबदल...