आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक साक्षर विचारांची मांडणी झाली पाहिजे: यमाजी मालकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जगात बदलत्या आर्थिक घडामोडीनुसार पैसा विनिमयाचे साधन न राहता साठवणुकीचे साधन बनत आहे. पैसा व्यवस्थेतील प्राणवायू बनला असून त्याचे जे शोषण करत आहेत त्याबाबत चर्चा होण्याची आवश्यकता आहे. जागतिकीकरणानंतर व्यवस्थेत पैशांचे महत्त्व वाढले असून व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी आर्थिक साक्षरतेच्या विचारांची मांडणी झाली पाहिजे, असे मत ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर यांनी रविवारी व्यक्त केले.

लोकबोधिनी संस्था आयोजित ‘समतेचा विचार व व्यवहार’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल व डॉ. रत्नाकर महाजन उपस्थित होते.

मालकर म्हणाले, शासन सक्षम झाल्याशिवाय लोकांचे दैनंदिन प्रश्न सुटणार नाहीत हे तत्त्व आपण मान्य केले पाहिजे. आज विषमतेचा अर्थ जातिव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता यापेक्षा अर्थकारणावर अधिक केंद्रित झाला आहे. जगाच्या साधनसंपत्तीच्या निकषानुसार देश कुठेही मागासलेला नाही, पण त्याचे न्याय्य वाटप होण्याच्या पद्धतीचा विचार होण्याची गरज आहे. भारतीयांची वृत्ती चांगली असून त्यांना उत्तम पद्धतीने साधने उपलब्ध झाली तर नागरिकांत शिस्त निर्माण होईल.