आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्र ब-हाटे हा एकनाथ खडसेंचा छोटा शकील, कोट्यावधीच्या जमिनी लाटल्या- रिबेका गौड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील रिबेका प्रदीप गौड (50) यांची पुणे-सातारा महामार्गावरील 44 गुंठे जमीन बोगस कागदपत्रांद्वारे हडपण्यात आली असून, याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र ब-हाटे, अॅड. अनिल कदम, बसवराज कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भोरमधील राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तिघांनाही त्वरित अटक करावी, अशी मागणी पुणेकर नागरिक कृती समिती आणि रिबेका गौड यांनी केली आहे. ब-हाटे हा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा छोटा शकील आहे, अशी टीका गौड यांनी केली. गौड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

रिबेका गौड म्हणाल्या, माझे पती प्रदीप अरविंद हे पेप्सी कंपनीत येमेन येथे कार्यरत होते. त्यांनी केळवडे गावाचे हद्दीतील गट नं. 77 बी/3 मधील 44 गुंठे बिगर शेतजमीन मिनरल वॉटरचा कारखाना सुरू करण्यासाठी खरेदी केली होती. परदेशात असल्याने त्यांनी 1997 मध्ये जागेची रखवाली करण्यासाठी बसवराज कोळी याच्या कुटुंबास येथे शेड बांधून राहण्यास जागा दिली होती. तसेच या जागेवर वीज, पाणी तसेच अन्य सुविधा घेण्यास साहाय्यभूत ठरावे याकरिता अॅड. अनिल कदम यांच्याकडे पॉवर ऑफ अॅटर्नीही प्रदीप यांनी करून दिली होती. मात्र 1999 मध्ये गौड मुंबई येथे गेले असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर एक वर्षाने मी जमिनीचा कर भरण्यासाठी गेल्या असता ही जमीन परस्पर भाडेकराराने दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे रिबेका गौड यांनी सांगितले.
गौड पुढे म्हणाल्या की, याप्रकरणी अधिक चौकशी केली असता अॅड. कदम यांनी आमची जमिन रवींद्र ब-हाटे याला परस्पर भाडेकराराने दिली. याविरोधात आम्ही कोर्टात धाव घेतली. 2013 मध्ये हा दावा आमच्या बाजूने लागला. तसेच जमिनीचा ताबा तीन महिन्यात देण्याचे आदेश कोर्टाने दिले. मात्र, तीन वर्षे झाली तरी ब-हाटे याने जमिन आम्हाला परत केलेली नाही. तसेच त्या जागेवर ब-हाटे याच्या नावाचा फलक लावलेला आहे असेही गौड यांनी सांगितले.
ब-हाटेंनी कमाविली हजारो कोटींची संपत्ती- थत्ते
गरीब लोकांच्या, विधवा, निराधार अशा असह्य नागरिकांची ब-हाटे यांनी हजारो एकर जमीन बळकावल्याचा आरोप पुणेकर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष मिहीर थत्ते यांनी केला आहे. मुक्ताईनगरच्या गजानन पाटीलप्रमाणे एकनाथ खडसे यांच्या नावाचा वापर करून आठ ते दहा वर्षांत भूखंडाचे दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ब-हाटेंनी केले आहेत. या सर्व व्यवहारांची चौकशी करावी, यासाठी समितीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ब-हाटेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लोकांनी त्याने ब्लॅकमेल केल्याचे, खंडणी मागितल्याची तसेच फसवणूक करून जमीन हडपल्याची अनेक प्रकरणे समितीकडे आली आहेत. ब-हाटे हा खडसेंचा छोटा शकील आहे. या छोट्या शकीलची खडसेरूपी कवचकुंडले आता उतरली आहेत. त्यांच्या त्रासातून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका करण्याचा निर्णय समितीने घेतला असल्याचे थत्ते यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...