आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल; जमीन बळकावण्याचा प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विविध योजनांसाठी केलेल्या भूसंपादनाच्या जमिनींच्या मालकीमध्ये बेकायदेशीर फेरफार करून ग्रामस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार आणि बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांच्याविरोधात वारजे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, काकडे यांनी मात्र हे अाराेप फेटाळले अाहेत. या बाबतचे सर्व पुरावे अापण न्यायालय व पाेलिसांना देणार असल्याचेही ते म्हणाले.

खडकवासला धरण तसेच एनडीए या प्रकल्पांसाठी परिसरातील न्यू कोपरे गावातील जमिनीचे संपादन करण्यात आले होते. त्या बदल्यात शासनाने तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी दुसरी जागा दिली. मात्र खासदार काकडे यांनी बनावट कागदपत्रे  तसेच कागदपत्रात खाडाखोड करून ग्रामस्थांची जमीन बळकावली व तेथे बांधकाम केले. तसेच काही जमीन प्लॉट म्हणून विकली. १४ एकर जमीन दिली असताना प्रत्यक्षात ३८ एकर जमीन बळकावण्यात आली. मनपाला त्यातील फक्त ७ एकर जमीन ‘एमिनिटी स्पेस’ म्हणून देण्यात आली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.   

याप्रकरणी दिलीप हरिभाऊ मोरे यांनी तक्रार दिली आहे. सकृतदर्शनी ग्रामस्थांची फसवणूक झाल्याचे दिसत असल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करणे आवश्यक असल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांच्या न्यायालयाने दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    
 
काकडेंनी आरोप फेटाळले
खासदार संजय काकडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपला संपूर्ण व्यवहार स्वच्छ असून आपल्या बदनामीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचा दावा काकडेंनी केला आहे.
आपण पोलिसांना या प्रकरणात तपासासाठी सर्व ते सहकार्य करु असे खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे. खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
जुलै महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने संजय काकडे यांचे भाऊ सूर्यकांत काकडे यांना दणका दिला होता. बळकावलेला 9 एकराचा भूखंड पालिकेच्या ताब्यात परत देण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला होता.
हेही वाचा
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...