आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: दोघींनी पाळल्या 30 मांजरी, उपद्रव-दुर्गंधी असह्य झाल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे तेथे काय उणे असे कधी काळी व काहीअंशी आजही म्हटले जाते. मात्र, पुण्यात आजकाल घडणा-या घटना पाहता पुणे तेथे उणेच असे म्हणण्याची वेळ आली आहे. मेधा खोले प्रकरण निवळत नाही तोवर आपल्या घरातील माजरांची निगा नीट न राखल्याने दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. दीपिका कपूर आणि संगीता कपूर (रा. कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.
 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दीपिका कपूर व संगीता कपूर या कोंढवा परिसरातील एका पॉश सोसायटीत राहतात. या दोघी भाड्याच्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये 30 मांजरींसह राहतात. मात्र, या दोघी मागील काही दिवसापासून या मांजरीच्या निगा नीट राखत नव्हत्या. या मांजरी संपूर्ण फ्लॅटमध्ये मोकळ्या राहत व काही अंशी सोसायटीत फिरायच्या. त्या राहत असलेला फ्लॅट अस्वच्छ झाला होता. त्यामुळे याची दुर्गंधी संपूर्ण सोसायटीत पसरली होती. याबाबत कपूर फॅमिलीला तक्रार देऊनही त्यांनीही काहीही काळजी घेतली नाही. अखेर सोसायटीतील लोकांनी या दोघींविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
 
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विदारक अवस्थेत असलेल्या 29 मांजरींना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची स्वच्छता करून एका ठिकाणी ठेवले. पोलिस आता या दोघींची चौकशी करत आहेत. तसेच इतक्या मांजरी पाळण्यामागे काय कारण आहे याचाही शोध घेत आहेत.
 
गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी त्यांच्या शेजाऱ्यांच्या मांजरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर वंदना चव्हाण व त्यांच्या शेजा-यांत आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला होता. नंतर वंदना चव्हाण यांनी मांजरांच्या मालकांवर थेट अब्रूनुकसानीचाच दावा दाखल केला होता. आता कपूर कुटुंबिय आणि शेजारी लोकांचा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.  
बातम्या आणखी आहेत...